महाराष्ट्र दिन २०२० : दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा!

महाराष्ट्र दिनाचे शुभेच्छा संदेश 



बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
गगनभेदी गिरिविण अणुनच जिथे उणे ।
आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ।
अटके परी जेथील तुरूंगि जल पिणे ।
तेथ अड़े काय जलाशय – नंदांविणे ।।
पौरुषासि अटक गमे जेथ दुःसहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।
अशा या महाराष्ट्राचे गुणगान गावे तेवढे कमीच. १ मे १९६० रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये अस्तित्वात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत १०५ आंदोलक हुतात्मे झाले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्याचे तमाम मराठी जनतेचे स्वप्न अखेरीस साकार झाले आणि अस्तित्त्वात आला तो अखंड महाराष्ट्र.
‘भीती न अम्हां तुझी मुळीही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा’
ही ओळ या संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या त्या प्रत्येक हुतात्माने सार्थ करून दाखवली. त्याच्या या बलिदानाला पुन्हा उजाळा देण्याचा आणि महाराष्ट्राचा पुन्हा एकदा जयजयकार करण्याचा हा दिन. आज ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. ट्विटरवर तर सकाळपासून #MaharashtraDay  हॅशटॅग ट्रेंड़िंगमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मराठी जनतेसाठी ट्विट करत मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेेच्छा दिल्या आहेत.  महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तमाम मराठी जनांना शुभेच्छा देणाऱ्या काही खास संदेशांचे संकलन घेऊन आलोत तुमच्यासाठी. दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
महाराष्ट्राची यशोगाथा,
महाराष्ट्राची शौर्यकथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा…

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा!
आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा आहे मातीशी!
हे राज्य व्हावे, ही तो श्रींची इच्छा, छत्रपती शिवराजांनी ती उमगली होती,
प्रत्यक्षात ती उतरवायला, १ मे १९६० ची पहाट उमगली होती!
लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती … महाराष्ट्र दिन
आणि कामगारदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!

0 comments